Nimrit Kaur Ahluwalia | निम्रत कौर अहलूवालिया या कारणामुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, थेट म्हटले की…
विशेष म्हणजे बिग बाॅस 16 मधून बाहेर पडल्यापासून निम्रत काैर अहलूवालिया हिच्या फॅन फाॅलोइंगमध्ये मोठी वाढ नक्कीच झालीये. बिग बाॅस 16 मध्ये जबरदस्त गेम खेळताना निम्रत काैर अहलूवालिया दिसली होती.
1 / 5
बिग बाॅस फेम आणि छोटी सरदारनी म्हणून एक वेगळी ओळख मिळणारी टिव्ही अभिनेत्री निम्रत काैर अहलूवालिया ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. बिग बाॅस 16 मध्ये सहभागी झाल्यापासून निम्रत काैर अहलूवालिया हिला एक वेगळी ओळख मिळालीये.
2 / 5
विशेष म्हणजे बिग बाॅस 16 मधून बाहेर पडल्यापासून निम्रत काैर अहलूवालिया हिच्या फॅन फाॅलोइंगमध्ये मोठी वाढ नक्कीच झालीये. बिग बाॅस 16 मध्ये जबरदस्त गेम खेळताना निम्रत काैर अहलूवालिया दिसली होती.
3 / 5
काही दिवसांपूर्वी अब्दू रोजिक याने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये निम्रत काैर अहलूवालिया धमाल करताना दिसली होती. नुकताच निम्रत काैर अहलूवालिया ही मुंबईमध्ये स्पाॅट झालीये. ज्याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.
4 / 5
व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओमुळे निम्रत नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलीये. निम्रतला मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. प्रिंटेड शॉर्ट ड्रेस घातल्यामुळे निम्रतला ट्रोल केले जात आहे. अनेकांनी ड्रेसमुळे निम्रतची खिल्ली उडवलीये.
5 / 5
एका युजर्सने या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, काय लहान मुलांसारखा शॉर्ट ड्रेस घातलाय. दुसऱ्याने निम्रतला टार्गेट करत लिहिले की, हिला अजिबातच ड्रेसिंग सेंस नाहीये, काहीही घालते.