अभिनेत्री नोरा फतेहीच्या स्टाईलवर चाहते कायमच फिदा असतात. नोरा सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती अनेक फोटो शेअर करते आहे.
नोरा फतेही तिच्या स्टाईलमुळे आणि सुकेश चंद्रशेखरमुळे खूप चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणी नोराच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झालीये.
सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नोराचे नाव आल्याने अनेकांना मोठा धक्काच बसलाय. नोरालाही सुकेश महागडे गिफ्ट देत असल्याचे सांगितले जात आहे.
नोराचे काही खास फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. नोराने या फोटोंमध्ये पिवळ्या रंगाचा ड्रेस कॅरी केल्याचे दिसत आहे. या फोटोंमध्ये नोराचा जबरदस्त लूक दिसत आहे.
नोराने या लूकमध्ये खास पोज देत फोटोशूट केले आहे. नोराचा हा बोल्ड लूक पाहण्यासारखा आहे. नोराचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडलाय.