बॉलिवूडची चर्चित नावं, तरी मृत्यूने गाठलं अन् कुणाला कळलंच नाही! ब्रह्माच नाही तर ‘या’ कलाकारांचा शेवटही वेदनादायी!

बॉलिवूडचे जग बाहेरून झगमगाटी दिसते, पण त्यात राहणार्‍या लोकांचे जीवन कधी अंधाराने भरून जाते, हे कोणालाच कळत नाही. एकेकाळी स्टार समजल्या जाणार्‍या कलाकारांना कधी ना कधी विस्मृतीत जगायला भाग पाडले जाते.

| Updated on: Dec 04, 2021 | 8:45 AM
सुपरहिट वेब सीरीजमध्ये काम करणारा अभिनेता ब्रह्मा मिश्रा याच्या निधनाची बातमी नुकतीच समोर आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 नोव्हेंबर रोजी त्याच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यानंतर डॉक्टरांकडून औषध घेऊन तो घरी परतला. दरम्यान, त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि वयाच्या 32 व्या वर्षी त्याचे निधन झाले. तीन दिवसांपासून त्याचा मृतदेह बाथरूममध्ये पडून होता, शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी येऊ लागली, त्यानंतर पोलिसांना फोन करून माहिती देण्यात आली. बरं, मृत्यूनंतर एखाद्या कलाकाराचा मृतदेह कुजत राहण्याची ही पहिलीच घटना नाही. या आधीही अनेक कलाकारांवर असा मृत्यू ओढवला आहे.

1 / 5
'द डर्टी पिक्चर'मध्ये विद्या बालनसोबत काम करणारी अभिनेत्री आर्या बॅनर्जीसोबतही असाच प्रकार घडला होता. 33 वर्षीय अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या कोलकाता येथील घरी संशयास्पद स्थितीत सापडला होता. दोन दिवसांनी पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा अभिनेत्रीचा मृतदेह रक्ताने माखलेला होता. पोलिसांनी दरवाजा तोडून अभिनेत्रीच्या घरात प्रवेश केला, तिथे तिचा मृतदेह बेडवर पडलेला आढळून आला. त्यावेळी तिच्या नाकातून रक्त येत होते.

2 / 5
प्रसिद्ध अभिनेत्री परवीन बाबी यांचे निधन अत्यंत वेदनादायी होते. परवीन बाबीला पॅरानॉइड स्किझोफ्रेनियाचे निदान झाले होते. 20 जानेवारी 2005 रोजी राहत्या घरी त्यांचा मृत्यू झाला. 3 दिवस त्यांचा मृतदेह घरात सडत होता. नंतर महेश भट्ट यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

3 / 5
अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारणारे महेश आनंद यांचे 2019 मध्ये निधन झाले. मृत्यूनंतर दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह राहत्या फ्लॅटमधून सापडला होता. अपयशाच्या काळात महेश आनंदचे कुटुंबीयही त्यांना सोडून गेले, असे म्हटले जाते.

4 / 5
कंगना रनौतसोबत रज्जो चित्रपटात काम केलेली अभिनेत्री कृतिका चौधरी हिचा मृतदेह तिच्या अंधेरी, मुंबई येथील घरातून सापडला होता. तीन-चार दिवसांपासून कृतिकाचा मृतदेह खोलीत पडून होता. शेजाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर सदर घटना समोर आली होती.

5 / 5
Follow us
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.