Hostel Life web Series | ‘गर्ल्स हॉस्टेल’ ते ‘कोटा फॅक्ट्री’, हॉस्टेल लाईफवर बनवलेल्या ‘या’ वेब सीरीज करतील जुन्या आठवणी ताज्या!
महाविद्यालयीन जीवनात वसतिगृह अर्थात हॉस्टेलमध्ये राहून मिळणारे स्वातंत्र्य आणि मजा इतर कोठेही मिळत नाही. घरी आयत्या गोष्टींची सवय असणरी लोक देखील येथे राहून स्वतःची काम स्वतः करायला शिकतात. पैसे वाचवायला शिकतात आणि आयुष्याचे अनेक धडे समजून घेतात, कधी रडतो तर कधी पोटभर हसतात.
महाविद्यालयीन जीवनात वसतिगृह अर्थात हॉस्टेलमध्ये राहून मिळणारे स्वातंत्र्य आणि मजा इतर कोठेही मिळत नाही. घरी आयत्या गोष्टींची सवय असणरी लोक देखील येथे राहून स्वतःची काम स्वतः करायला शिकतात. पैसे वाचवायला शिकतात आणि आयुष्याचे अनेक धडे समजून घेतात, कधी रडतो तर कधी पोटभर हसतात. बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीनेही अनेक वेळा अशाच प्रकारचे ‘हॉस्टेल लाईफ’ पडद्यावर चितारले आहे. चला तर, आज आपण हॉस्टेल लाईफवर आधारित असलेल्या काही वेब सीरीजबद्दल जाणून घेऊ...
Follow us
महाविद्यालयीन जीवनात वसतिगृह अर्थात हॉस्टेलमध्ये राहून मिळणारे स्वातंत्र्य आणि मजा इतर कोठेही मिळत नाही. घरी आयत्या गोष्टींची सवय असणरी लोक देखील येथे राहून स्वतःची काम स्वतः करायला शिकतात. पैसे वाचवायला शिकतात आणि आयुष्याचे अनेक धडे समजून घेतात, कधी रडतो तर कधी पोटभर हसतात. बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीनेही अनेक वेळा अशाच प्रकारचे ‘हॉस्टेल लाईफ’ पडद्यावर चितारले आहे. चला तर, आज आपण हॉस्टेल लाईफवर आधारित असलेल्या काही वेब सीरीजबद्दल जाणून घेऊ…
गर्ल्स हॉस्टेल : घरात राहणाऱ्या मुली जेव्हा हॉस्टेलच्या जगात प्रवेश करतात तेव्हा त्यांना तिथे खूप वेगवेगळे अनुभव येतात. या मालिकेत मैत्री, प्रेम, रूममेट्सची मारामारी आणि हॉस्टेल फंक्शन्स असे अनेक पैलू दाखवण्यात आले आहेत. एवढेच नाही तर मुलींची गंमत आणि महिला सक्षमीकरणाचा मुद्दाही अतिशय चपखलपणे दाखवण्यात आला आहे. ही सीरीज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
क्लास ऑफ 2017 : ही सीरीज एक टीम ड्रामा वेब शो आहे, जो शाळेत जाणाऱ्या मुलांची कथा दर्शवतो. कौटुंबिक दबाव, समस्या, मादक पदार्थांचे व्यसन या समस्यांना ही मुले कशी तोंड देतात, याचे चित्रीकरण आहे. या शोचा सिक्वेल ‘क्लास ऑफ 2020’ या नावाने प्रदर्शित झाला होता. ही सीरीज तुम्ही Alt Balaji आणि Zee5वर पाहू शकता.
कोटा फॅक्टरी : वसतिगृहात राहणे म्हणजे केवळ मजा करणे, भांडणे आणि मारामारीच नाही, तर या काळात शिकणारी मुले आणि त्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, हे यात दाखवले आहे. जर तुम्ही कधी आयआयटीची तयारी केली असेल, तर तुम्हाला हा शो आपल्या आयुष्याचा एक भाग वाटू शकतो. यात आयआयटी-जेईई इच्छुकांच्या दैनंदिन जीवनाची कथा दाखवण्यात आली आहे. त्याचा दुसरा भागही लवकरच प्रदर्शित होणार आहे.
हॉस्टेल डेज : या वेब सीरीजमध्ये चार मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे, जे वसतिगृहात आल्यानंतर रॅगिंगचे बळी ठरतात. सिनिअर्ससोबत राहत असताना, ते अभ्यासासह गैरवर्तन आणि गुंडगिरी शिकतात. या सीरीजचे दोन्ही सीझन प्रेक्षकांना खूप आवडले. ही बॉईज हॉस्टेलची मजा प्रत्येकाला आवडली आहे.
इंजिनिअरिंग गर्ल्स : या सीरीजमध्ये अभियांत्रिकी शिकणाऱ्या तीन मुलींची कथा दाखवण्यात आली आहे. यातील दोन मुली वसतिगृहात राहतात. अभ्यासाच्या दबावामध्ये आणि कुटुंबापासून दूर असताना त्या आपले कामे आणि वैयक्तिक आयुष्य कसे हाताळतात, हे यात दाखवले आहे.