सारा अली खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सारा आणि शुभमन गिल यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.
सारा आणि शुभमन यांचा व्हिडीओ विमानतळावरील होता. सारा अली खान आणि शुभमन गेल्या काही दिवसांपासून डेट करत असल्याच्या बातम्या आहेत.
नुकताच सारा अली खानने सुंदर फोटोशूट केले आहे. साराच्या नव्या फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.
हिरव्या रंगाच्या सलवार सूटमध्ये सारा अली खानने जबरदस्त असे फोटोशूट केले आहे. यामध्ये साराचा लूक एकदम सुंदर दिसत आहे.
पल पल न माने टिंकू जिया या गाण्यावर सारा अली खानने खतरनाक डान्स केला होता. ज्याचा व्हिडीओ साराने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता.