महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात सुत्रसंचलनाची भूमिका पार पाडणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून ती कसदार अभिनयासाठी ओळखली जाते. महाराष्ट्रात तिचे लाखे चाहते आहेत.
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सतत नवे फोटोशूट करत असते.
आता तिनं छान डिझायनर ड्रेसमध्ये नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
प्राजक्ता माळी या अभिनेत्रीने आणि काशिनाथ घाणेकर, खो-खो, गोळाबेरीज, संघर्ष अशा चित्रपाटांतून कसदार अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
तर प्राजक्तानं आणखी एका हटके साडीमध्ये फोटोशूट केलं होतं. त्यात तिची हेअर स्टाईल लक्षवेधी ठरली होती. हे फोटो शेअर करत तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘ही hairstyle बघून पप्पा म्हणाले, केसांचा कोंबडा छान केलाय’