Rabindranath Tagore Death Anniversary | रवींद्रनाथ टागोरांच्या रचनांवर बनलेले ‘हे’ प्रसिद्ध चित्रपट, पाहताना प्रेक्षक आजही होतात भावूक!
आज (7 ऑगस्ट) महान संगीतकार, चित्रकार, लेखक, कवी आणि विचारवंत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) यांची पुण्यतिथी आहे. साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळालेले ते पहिले आशियाई व्यक्ती होते. त्यांचे साहित्य आजही वाचले जाते.
1 / 5
आज (7 ऑगस्ट) महान संगीतकार, चित्रकार, लेखक, कवी आणि विचारवंत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) यांची पुण्यतिथी आहे. साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळालेले ते पहिले आशियाई व्यक्ती होते. त्यांचे साहित्य आजही वाचले जाते. गुरुदेव रवींद्रनाथ यांचा जन्म 7 मे 1861 रोजी कोलकाता येथे झाला होता, त्यांचे 7 ऑगस्ट 1941 रोजी कोलकाता येथे निधन झाले. गुरुदेव रवींद्रनाथ यांनी त्यांच्या जीवन प्रवासात साहित्य, संगीत अशा प्रकारे रुजवले, जे आजही जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांच्या काही रचनांवर चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट देखील बनवले आहेत.
2 / 5
1946 मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन बोस यांचा 'मिलन' हा चित्रपट रवींद्रनाथ टागोरांच्या ‘नौका डूबी’ या कादंबरीच्या कथेवर बनला होता. दिलीप कुमार यांच्या आयुष्यातील हा पहिला हिट चित्रपट होता.
3 / 5
गुरुदेव रवींद्रनाथांच्या रचनांमध्ये त्यांची सर्वात प्रसिद्ध रचना ‘काबुलीवाला’ होती. बिमल रॉय यांनी त्यांच्या या रचनेवर 1961मध्ये ‘काबुलीवाला’ हा चित्रपट बनवला. आजही हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतो.
4 / 5
गुरुदेव रवींद्रनाथांच्या रचनेत एक ‘समाप्ती’ नावाची एक रचना देखील होती. निर्माते रॉय सुधेंदुने या कथेवर त्याचा 1971चा ‘उपहार’ हा चित्रपट बनवला. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला.
5 / 5
1997मध्ये रवींद्रनाथांच्या 'चार अध्याय' या कादंबरीवर आधारित ‘चार अध्याय’ हा चित्रपट बनला आहे. या कथेत आपल्याला ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या बंडाबद्दल माहिती मिळते.