सोनी टीव्हीच्या इंडियन आयडल सीझन 12 च्या आगामी शनिवार आणि रविवारच्या भागात मॉन्सून फूड फेस्ट असणार आहे. यावेळी सर्व स्पर्धक एकत्र येतील कारण या भागाची थीम आहे मॉन्सून स्पेशल.
मान्सून स्पेशलच्या थीमनुसार अरुणितानं अनु मलिकच्या विनंतीनुसार सेटवर प्रत्येकासाठी चविष्ट भजी बनली.
मान्सून स्पेशलमध्ये सयाली कांबळे यांची इच्छा पूर्ण करत सेटवर हॉट कॉर्न तयार करण्यात आले आणि सर्वांनी याचा आनंद लुटला.
आयडलच्या टॉप 7 मध्ये या भागातील शूटिंगमध्ये सर्वांनी धमाल केली आहे. शूट दरम्यान सर्वांनी चवदार भजींचा आनंदही लूटला.
या खास भागात पावसाची मजेदार गाणीही सादर करण्यात येणार आहेत.