Raksha Bandhan 2024: बॉलिवूडच्या या भाऊ-बहिणींमध्ये वाद, एकमेकांचा चेहरा ही बघत नाहीत
रक्षाबंधनाचा सण सर्वांसाठी खास असतो. कारण या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीसाठी भेटवस्तू घेऊन येतो. हा भाऊ-बहिणीचा दिवस खूप खास असतो. रक्षासूत्र बांधल्याने भाऊ-बहिणीचे नाते अधिक घट्ट होते असे मानले जाते. सर्वसामान्यांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सगळेच जण रक्षाबंधनाचा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात. चित्रपट कलाकारही हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात. चित्रपटसृष्टीत अनेक भाऊ-बहिणी आहेत जे एकमेकांसाठी काहीही करायला तयार असतात. जसे की, अर्जुन कपूर-अंशुला कपूर, सारा अली खान-इब्राहिम अली खान, रणबीर कपूर- रिद्धिमा सहानी, अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन. पण तुम्हाला माहितीये का की यामध्ये अनेक स्टार्स असे ही आहेत ज्यांचं नातं आज तुटलं आहे. बॉलिवूड स्टार्सची भाऊ-बहीण जोडी जी एकमेकांचा तिरस्कार करू लागली आहेत.
Most Read Stories