दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी त्यांच्या उत्तराखंड ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये दोघांची रोमँटिक केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह ही जोडी बॉलिवूडमधील क्यूट कपलपैकी एक आहे. चाहत्यांनाही दोघांची जोडी खूप आवडते.
अलीकडेच, दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस होता आणि त्यानिमित्त दोघेही उत्तराखंडला गेले होते. तिथे दोघांनी लग्नाचा वाढदिवस साजरा केला. तसेच दोघांनी चाहत्यांचीही भेट घेतली.
दीपिकाने आता ट्रीपमधील स्वतःचे आणि रणवीरचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर होताच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. दीपिका आणि रणवीरची ही सुंदर केमिस्ट्री पाहून चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांकडून खूप प्रेमाचा वर्षाव होत आहे.
रणवीर आणि दीपिकाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले, तर लवकरच दोघांचा ‘83’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये रणवीर कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात दीपिकाचाही एक कॅमिओ आहे. याशिवाय शकुन बत्राच्या चित्रपटातही दीपिका दिसणार आहे.