नवऱ्यासोबत सवतला पाहून रवीना टंडन हिचा चढला होता पारा, थेट फेकला ज्यूसचा ग्लाॅस, नताशा सिप्पीला मोठी दुखापत
बाॅलिवूड अभिनेत्री हिने एक काळ प्रचंड गाजवलाय. रवीना टंडन ही तिच्या पर्सनल लाईफमुळे कायमच चर्चेत असते. रवीना टंडन हिचा एका पार्टीमध्ये सवतीला पाहून इतका पारा चढला की तिने असे काही केले की, तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.
1 / 5
अनिल थडानी आणि त्यांची पत्नी नताशा सिप्पी यांच्या नात्यामध्ये सर्वकाही व्यवस्थित नव्हते. अत्यंत नाजूक परिस्थितीमधून यांचे नाते जात होते. यावेळी अनिल थडानी यांच्या मदतीला अभिनेत्री रवीना टंडन धावून आली.
2 / 5
शेवटी अनिल थडानी आणि त्यांची नताशा सिप्पी यांच्यामध्ये घटस्फोट झाला. अनिल थडानी आणि नताशा सिप्पी यांच्यामध्ये घटस्फोट झाल्यानंतर रवीना टंडन हिची अनिल थडानी जवळीकता वाढली.
3 / 5
शेवटी अनिल थडानी यांनी एका पार्टीमध्ये रवीना टंडनला प्रपोज केला आणि हे दोघे लग्न बंधनात अडकले. आता रवीना आणि अनिल थडानी यांच्या नात्याला तब्बल 19 वर्ष पुर्ण झाली आहेत. मात्र, एका पार्टीमध्ये एका किस्सा असा घडला की, सर्वांनाच मोठा धक्का बसला.
4 / 5
एका पार्टीमध्ये अनिल थडानी, नताशा सिप्पी आणि रवीना टंडन हे एकत्र आले. मात्र, नताशा सिप्पीला पाहून रवीना टंडन हिला इतका जास्त संताप आला की, तिने कोणताही विचार न करता नताशा हिच्या अंगावर ज्यूसचा ग्लाॅस फेकला.
5 / 5
रवीना टंडन हिने नताशा हिच्या अंगावर ज्यूसचा ग्लास फेकल्याने तिला मोठी दुखापत झाली होती. कारण तो ग्लाॅस काचेचा होता. यामुळे नताशा हिच्या हातातून रक्त निघत होते. एका मुलाखतीमध्ये रवीना टंडन हिने सांगितले की, यावर आपल्याला पश्चाताप अजिबात नाहीये.