Rina Madhukar : नवरात्री विशेष; पाहा कोण आहे रिना मधुकरच्या आयुष्यातील आदिशक्ती
समंजस, शांत, सर्वांना सांभाळून घेणारी, जेव्हा आई आणि माझ्यामध्ये तू तू मैं मैं होतं तेव्हा मध्यस्थी घेणारी रूपा...! तिचं आणि माझं नातं फार सुंदर आणि मैत्रिणी सारखं आहे. वयाने मी तिच्या पेक्षा जरी मोठी असली तरी ती माझं काही चुकलं, अगदी सुरुवातीपासून माझा एखादा सीन तिला नाही आवडला किंवा अपेक्षेप्रमाणे तो नीट नाही झाला की ती मोकळेपणाने "मला हा सीन नाही आवडला, यापेक्षा जास्त चांगला होऊ शकला असता" असं थेट सांगते. थोडक्यात काय तर ती माझी बेस्ट समीक्षक आहे. इतकेच नव्हे तर शाळेत असताना माझे कोणाशी वादविवाद झाले तर छोटी बहीण येऊन सर्व सांभाळून घ्यायची. असं आहे आमचं नातं... ती माझी शक्ती आहेच पण तिच्यातले दोन गुण जे मला जास्त प्रेरित करतात ते म्हणजे तिचं कामा प्रती असलेलं 'डेडीकेशन आणि चिकाटी'. (Rina Madhukar: Navratri Special; See who is Adishakti in Rina Madhukar's life)
Most Read Stories