RRR | कुणी हातावर बनवला अभिनेत्याचा टॅटू, कुणी दिली फोटोफ्रेम गिफ्ट, राम चरणच्या या चाहत्यांची क्रेझ पाहून थक्क व्हाल!
राम चरणच्या जबरदस्त फॅन फॉलोइंगबद्दल आपण सर्वच परिचित आहोत. तेलुगू चित्रपटसृष्टीतील त्याच्या दमदार कामगिरीमुळे तो लाखो हृदयांवर राज्य करतो. त्याचे चाहते फक्त दक्षिणेपुरतेच मर्यादित नाहीत, तर देशाच्या कानाकोपऱ्यात त्याच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे.
गेल्या काही काळापासून, आपण सर्वजण हे पाहत आहोत की, तो RRR च्या प्रमोशनच्या संदर्भात वेगवेगळ्या शहरांमध्ये जात आहे, जिथे तो त्याच्या चाहत्यांना पर्सनली भेटण्याची संधी अजिबात सोडत नाही.
Follow us

मेगा पॉवरस्टार राम चरणच्या चाहत्यांनी त्यांच्या अनोख्या गिफ्ट्सनी त्याला आश्चर्यचकित केले. चाहते रामचरणला भेटायला खूप उत्सुक दिसत होते.
राम चरण जेव्हा तो मुंबईत होता, तेव्हा त्याची एक चाहती त्याला भेटयला गेली, तेव्हा ती आनंदाने रडली. मग, तीच चाहती त्याच्या ऑटोग्राफसाठी त्याची फोटोफ्रेम घेऊन त्याच्याकडे गेली.
चाहत्यांची क्रेझ एवढ्यावरच मर्यादित न राहता त्याच्या एका चाहत्याने त्याच्या हातावर ‘RRR’ अवतारात टॅटू काढला आहे.