किसी का भाई किसी की जान या चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून सलमान खान हा चर्चेत आहे. सलमान खान याचा हा चित्रपट 21 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते सलमान खान याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.
किसी का भाई किसी की जान या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सध्या सलमान खान हा दिसत आहे. नुकताच सलमान खान हा चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्मा याच्या शोमध्ये पोहचला होता.
सलमान खान याने कपिल शर्मा याच्या शोमध्ये एक किस्सा सांगितला. सलमान खान म्हणाला की, ज्यावेळी मी काॅलेजमध्ये जात होतो, तेंव्हा मी ट्रेनने जायचो. मात्र, एकेदिवशी मला आरामदायी प्रवास करून काॅलेजला जाण्याची इच्छा झाली.
मी टॅक्सीने काॅलेजला जाण्याचे ठरवले, पण माझ्याकडे पैसे नव्हते. मी माझ्या कॉलेजपासून एका लेनच्या अगोदरच ड्रायव्हरला थांबवले आणि त्यांना सांगितले की इथे थांबा, मी पैसे घेऊन येतो आणि मग मी परत तिकडे गेलोच नाही. मी मॉडलिंग करण्यास सुरूवात केली आणि माझ्याकडे पैसे येऊ लागले.
मग एकेदिवशी मला तेच टॅक्सी ड्रायव्हर भेटले. मी त्यांना ओळखले. ते मला सतत म्हणत होते तुला मी कुठेतरी बघितले आहे. उतरल्यानंतर मी त्यांना म्हणालो थांबा मी वरून पैसे घेऊन येतो. त्यानंतर त्यांनी मला ओळखले आणि आम्ही दोघे हसायला लागतो. मी त्यांना व्याजासह पैसे परत केले, असेही सलमान खान म्हणाला.