
शाहरुख खान हा त्याच्या पठाण चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. पठाण चित्रपटाची जादू अजूनही बाॅक्स आॅफिसवर बघायला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे शाहरुख खान याने त्याच्या आगामी जवान चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरूवात केलीये.


नुकताच सलमान खान याचा भाऊ अरबाज खान याने एका शोमध्ये शाहरुख खान याच्याबद्दल एक धक्कादायक विधान केले आहे. अरबाज खान याचे हे विधान ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

थेट अरबाज खान हा शाहरुख खान याला फेक असल्याचे म्हटला आहे. अरबाज खान म्हणाला की, मला असे वाटते की शाहरुख खान हा त्याचा चांगुलपणा आणि वास्तव छोट्या पडद्यावर आणू शकला नाही. लोकांना तो खोटा वाटत असावा.
