सलमान खान याचे पनवेल येथील फार्महाऊस आहे अत्यंत आलिशान, तब्बल 80 कोटी रुपयांची मालमत्ता, 150 एकरमध्ये जिम, बंगले, स्विमिंग पूल, पाहा फोटो
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा कायमच चर्चेत असतो. सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय. मात्र, सलमान खान याच्या या चित्रपटाला म्हणाला तसा प्रतिसाद हा प्रेक्षकांना मिळाला नाहीये. सलमान खान याच्या चित्रपटातून पलक तिवारी हिने बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
1 / 5
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याचा किसी का बाई किसी की जान हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय. मात्र, सलमान खान याच्या या चित्रपटाला म्हणाला तसा प्रतिसाद हा प्रेक्षकांचा भेटला नाहीये. सलमान खान हा कायमच चर्चेत राहणारा बाॅलिवूड अभिनेता आहे.
2 / 5
सलमान खान याचे पनवेल येथील फार्महाऊस चर्चेत असते. सलमान खान बऱ्याच वेळा पनवेलच्या फार्महाऊसवर पार्ट्या आणि छान वेळ घालवताना दिसतो. सलमान खान याच्या बहिणीचे नाव हे पनवेलच्या फार्महाऊसला दिले आहे. सलमान खान याचे हे फार्महाऊस अत्यंत आलिशान आणि लग्झरी आहे.
3 / 5
रिपोर्टनुसार, सलमान खान याचे फार्महाऊस 150 एकरमध्ये पसरलेले आहे. या फार्महाऊसमध्ये तीन आलिशान बंगले, एक अत्यंत मोठा स्विमिंग पूल, फिटनेस सेंटर आणि अत्याधुनिक जिम देखील आहे. या फार्महाऊसवर बऱ्याच वेळा सलमान खान बागेत काम करताना देखील दिसतो. फार्महाऊसमध्ये फळांच्या बागा देखील आहेत.
4 / 5
सलमान खान याच्या या पनवेलच्या फार्महाऊसमध्ये अनेक जातींचे घोडे देखील आहेत. फार्महाऊसवर सेंद्रिय शेती केली जाते. लॉकडाऊन दरम्यान स्वत: सलमान खान हा पनवेलच्या फार्महाऊसमधील शेतीत काम करताना दिसला होता. याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते.
5 / 5
सलमान खान याचे पनवेल येथील फार्महाऊस अत्यंत आलिशान असून रिपोर्टनुसार त्याची किंमत ही 80 कोटी रुपये आहे. सलमान खान हा कायमच त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर जास्त वेळ घालताना दिसतो. बऱ्याच वेळा तो पार्टीचे आयोजन देखील त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर करतो.