सैफ अली खानची लेक सारा अली खान कायमच चर्चेत असते. सारा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करते.
काही दिवसांपूर्वी सारा अली खानचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. सारा या व्हिडीओमध्ये हटके पध्दतीने डान्स करताना दिसली होती.
नुकताच सारा अली खानने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. साराने फोटो शेअर करताना दिलेल्या कॅप्शनमुळे ती चर्चेत आलीये.
सारा अली खानने शेअर केलेले फोटो चक्क रोहन श्रेष्ठने काढले आहेत. रोहन श्रेष्ठ अगोदर श्रद्धा कपूरला डेट करत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सारा आणि रोहनचे नाव जोडले जातंय.
साराने फोटो शेअर करताना हे स्पष्ट केले आहे की, हे फोटो रोहन श्रेष्ठने काढले आहेत. यामुळे परत एकदा चर्चा सुरू आहे की, सारा आणि रोहन रिलेशनशिपमध्ये आहेत.