बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान इंडस्ट्रीतील गोंडस अभिनेत्रींपैकी एक आहे. सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिचा लूक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.
लहानपणीच्या फोटोंपासून ते लेटेस्ट फोटोशूटपर्यंत सारा प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर करते. आता तिचे चाहतेही तिच्या कवितांसाठी वेडे झाले आहेत, जे ती फोटोसह कॅप्शनमध्ये लिहिते. आता, सारानं तिच्या नव्या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यात ती सुंदर दिसत आहे.
यावेळी सारा बिकिनीमध्ये दिसत आहे. यासोबत तिनं प्रिंटेड श्रगनं आपलं शरीर झाकलं आहे.
ती वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. चाहते तिच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत, तसेच सेलेब्स देखील तिच्या या लूकनं इंप्रेस झालेले दिसत आहेत. मनीष मल्होत्रा, सबा पतौडी यांच्यासह अनेकांनी त्याच्या फोटोंवर कमेंट केल्या आहेत.
सारा अली खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर साराचा शेवटचा चित्रपट कुली नंबर 1 होता ज्यात ती वरुण धवनसोबत दिसली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. दुसरीकडे, ती आता अतरंगी रे या चित्रपटाचा एक भाग असेल.