बॉलिवूडची डान्सिंग क्वीन नोरा फतेही तिच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. नोराचा हॉट आणि बोल्ड लूक अनेकदा चाहत्यांमध्ये धुमाकूळ घलतो. नोरा सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो शेअर करत असते.
नोरानं पुन्हा एकदा तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकनं चाहत्यांना वेड लावलं आहे. तिनं पुन्हा तिच्या ग्लॅमरस लूकचे काही फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ती शिमरी निळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे. तिने डार्क रेड लिपस्टिक सोबतच हाय हील्स कॅरी केल्या आहेत. नोराची ही स्टाईल मनाला भिडणारी आहे.
फोटोंमधील तिची स्टाईल पाहून चाहते पुन्हा तिच्यासाठी वेडे झाले आहेत.
नोरा आता बॉलिवूडची राइजिंग स्टार बनली आहे. नुकतंच नोरानं इन्स्टाग्रामवर काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत, जे खूपच व्हायरल होत आहे.
नोराचा सोशल मीडियावर चांगला फॅन फॉलोइंग आहे. इंस्टाग्रामवर नोरा फतेहीचे 29.5 मिलीयन फॉलोअर्स आहेत.