
शाहरुख खान याची पत्नी गौरी खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केल्याने चर्चेत आलीये. या पोस्टसोबतच गौरी खान हिने एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केलाय.

गौरी खान हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये शाहरुख खान याची पूर्ण फॅमिली दिसत आहे. सर्वांनी काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे कपडे घातले आहेत. या फोटोमध्ये सर्वांचाच लूक जबरदस्त दिसतोय.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत गौरी खान हिने परिवार वह है जो घर बनाता है....असे लिहिले आहे. हे एक कमर्शियल प्रमोशन असल्याचे सांगितले जात आहे.

या फोटोमध्ये शाहरुख खान, आर्यन खान, गौरी खान, सुहाना खान आणि अबराम खान हे दिसत आहेत. सर्वांना अगोदर वाटले की, गौरी खान हिने तिच्या पुस्तकाची घोषणा

आता गौरी खान हिची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत असून सुंदर परिवार असल्याचे म्हणताना दिसत आहेत.