बिग बॉस 13 पासून शहनाज गिलची फॅन फॉलोव्हिंग चांगलीच वाढली आहे. तिच्या चाहत्यांना ती प्रचंड आवडते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. शहनाज गिल सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह असते.
शहनाझची स्टाईल सर्वांना वेड लावते. यावेळी शहनाज गिलनं तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
शहनाज गिलनं नुकतंच बॅकलेस फ्लोरल ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शहनाज तिचा सुंदर लूक फ्लॉन्ट करत आहे.
या फोटोंमध्ये शहनाज गिल बेडवर बसून पोज देताना दिसतेय. या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
शहनाज गिलने तिच्या या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांची मनं जिंकली आहेत. एका चाहत्यानं कमेंटमध्ये लिहिलं की, ' शहनाज कौन सी चक्की का आंटा खा रही हो जो इतना हॉट हो रही हो..'
शहनाज गिल लवकरच 'हौसला रख' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता सोबत दिलजित दोसांझसुद्धा झळकणार आहे. चित्रपटाचं शूटिंग कॅनडामध्ये पूर्ण झालं आहे.