‘रस्की वेड्स आदि’, ‘शनाया’ फेम अभिनेत्री रसिका सुनीलने गुपचूप बांधली लग्नगाठ!

| Updated on: Oct 30, 2021 | 6:10 PM

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनायाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनीलने प्रियकर आदित्य बिलागीशी लग्न केलं आहे.

1 / 5

2 / 5
गोव्याच्या किनाऱ्यावर डेस्टिनेशन वेडिंग करत, मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला आहे. 18 ऑक्टोबर रोजी ही अभिनेत्री लग्न बंधनात अडकली आहे.

3 / 5
या वर्षाच्या सुरुवातीस रसिकाने तिच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. ‘दो हजार एक किस...सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. 2020 या वर्षभरात अनेक वाईट घडामोडी घडल्या असल्या तरी कृतज्ञ राहण्यासाठी या वर्षाने अनेक कारणं दिली आहेत’, असे कॅप्शन देत तिने आदित्यासोबतचे फोटो शेअर केले होते.

4 / 5
शिक्षणासाठी यूएसला गेलेली असताना रसिकाची आणि आदित्यची ओळख झाली. इथेच दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. वर्षाखेर ही जोडी लग्नबंधनात अडकली आहे.

5 / 5
माध्यमांपासून दूर, गोव्यात छान समुद्र किनारी रसिका आणि आदित्यचा हा विवाह सोहळा पार पडला आहे. सोसलं मीडियावर एक फोटो पोस्ट करत त्यांनी चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.