मराठमोळी शिबानी दांडेकर हिने नुकतीच अभिनेता फरहान अख्तरशी लग्नगाठ बांधली.
अत्यंत जल्लोषात पार पडलेल्या या लग्नसोहळ्याचे फोटो या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
खंडाळामध्ये पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला बॉलिवूडमधल्या बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती.
लग्नानंतर शिबानीने सोशल मीडिया अकाऊंटवरील तिच्या नावात बदल केला आहे.
अख्तरांची सून होताच शिबानीने तिचं नाव आता शिबानी दांडेकर-अख्तर असं केलं आहे.
शिबानीने तिच्या प्रोफाइल बायोमध्ये 'मिसेस अख्तर' असंही लिहिलं आहे.
१९ फेब्रुवारी रोजी फरहान आणि शिबानीने लग्न केलं.
विशेष म्हणजे या दोघांनी हिंदू किंवा मुस्लीम पद्धतीने लग्न न करता लग्नाची वचनं vows घेत, रिंग सेरेमनी करत ते विवाहबद्ध झाले.
लग्नात शिबानीने लाल रंगाचा गाऊन परिधान केला होता.
फरहान आणि शिबानीची पहिली भेट ही एका रिअॅलिटी शोच्या सेटवर झाली.
त्यावेळी फरहान विवाहित होता आणि त्या रिअॅलिटी शोचा सूत्रसंचालक होता.
शिबानी त्या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या शोदरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.
फरहान-शिबानीच्या लग्नातील धमाल
लग्नसोहळ्यातील क्षणचित्रे