बाॅलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार हा कायमच चर्चेत असतो. शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार हे दोघे बरीच वर्ष एकमेकांना डेट करत होते. इतकेच नाहीतर त्यांच्या लग्नाच्या देखील चर्चा होत्या.
ज्यावेळी अक्षय कुमार हा शिल्पा शेट्टी हिला डेट करत होता. त्यावेळी तो ट्विंकल खन्ना हिला देखील डेट करत होता. ज्यावेळी ही गोष्ट शिल्पा शेट्टी हिला समजली त्यावेळी तिला मोठा धक्का बसला.
रात्रीच्या अंधारानंतर सकाळ होतेच. माझ्यासाठी व्यावसायिकदृष्ट्या सर्व काही ठीक सुरू होते, परंतु माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप मोठे चढ-उतार आले. पुढे शिल्पा शेट्टी म्हणाली की, अक्षय कुमार याने गर्लफ्रेंडचे मन वळवण्यासाठी एक खास उपाय शोधून ठेवला होता.
अक्षय त्याच्या गर्लफ्रेंडला रात्री उशिरा मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात घेऊन जात असे आणि तिच्याशी लग्न करण्याचे तिथे वचन देत असे. मात्र, परत त्याच्या आयुष्यात एखादी मुलगी आली की, तो दिलेले वचन विसरून जायचा.