Sidnaaz : शेवटच्या म्युझिक व्हिडीओ दरम्यान सिद्धार्थ आणि शहनाजची धमाल, अनसिन फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल
शहनाज आणि सिद्धार्थ एका म्युझिक व्हिडीओवर काम करत होते. त्यांचा म्युझिक व्हिडीओ अजून रिलीज झालेला नाही. पण या व्हिडीओ दरम्यानचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. (Sidnaaz: Siddharth and Shahnaz's fun during last music video)
Follow us
अभिनेता सिद्धार्थ शुक्लानं या जगाचा निरोप घेतला आहे. सिद्धार्थच्या मृत्यूमुळे प्रत्येकजण शॉकमध्ये आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या जाण्यानंतर शहनाज गिल पूर्णपणे खचली आहे. सिद्धार्थ आणि शहनाज बिग बॉस 13 मध्ये एकमेकांना भेटले होते. आता दोघांचे काही फोटो व्हायरल होत आहेत.
शहनाज आणि सिद्धार्थ एका म्युझिक व्हिडीओवर काम करत होते. त्यांचा म्युझिक व्हिडीओ अजून रिलीज झालेला नाही. पण या व्हिडीओचे काही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शहनाज आणि सिद्धार्थ या फोटोंमध्ये मस्ती करताना दिसत आहेत. फोटो समुद्र किनाऱ्यावरील दिसत आहेत. ज्यात दोघं निळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहेत.
फोटोंमध्ये दोघंही समुद्राजवळ बसलेले आहेत. एका फोटोमध्ये शहनाज सिद्धार्थचा हात फिरवत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये ती सिद्धार्थवर रागावून बसलेली दिसत आहे.
रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर श्रेया घोषालच्या गाण्याचा हा व्हिडीओ आहे. या म्युझिक व्हिडीओचें अर्ध शूटिंग पूर्ण झालं आहे. चाहते आता हे गाणं रिलीज करण्याची मागणी करत आहेत. ते म्हणत आहे की या गाण्यासाठी जे काही शूटिंग केलं गेलं आहे, ते त्यासह रिलीज करा.