गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर सध्या हनिमून इन्जॉय करत आहेत. त्याचे फोटो या दोघांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
रोहित आणि जुईली लग्नानंतर हनिमूनसाठी गोव्यात गेले आहेत. वर्का बिचवर दोघेही इन्जॉय करताना दिसत आहेत. तिथले रोमॅन्टिक फोटो दोघींनीही आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
रोहितीने त्यांच्या इन्स्टाग्रामला हा फोटो शेअर केला आहे. याला त्याने "दिल की ऐ धड़कन ठेहर जा, मिल गयी मंज़िल मुझे" असं कॅपशन दिलं आहे.
जुईलीनेही आपले हे खास फोटो शेअर केले आहेत. याला तिने "जेव्हा माझा पती माझे फोटो काढतो...", असं कॅप्शन दिलं आहे.
रोहित आणि जुईली यांनी काही दिवसांआधी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती.