सौंदर्य, अभिनय आणि उत्तम नृत्यकला यासाठी ओळखली जाणारी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं पुन्हा एकदा चाहत्यांना घायाळ केलं आहे.
तिनं आता सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
काही दिवसांपासून सर्वजण हॅलोविन वीक साजरा करत आहेत. त्या निम्मीताने सोनाली कुलकर्णीनं काळा रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
तिचा हा हॅलोविन लुक पाहून घाबरण्या ऐवजी लोक तिच्या प्रेमातच पडले आहे.
एक वेगळा लूक देण्यासाठी तिने हे फोटोशूट इमारतीच्या गच्चीवर केले आहे
या लोकेशनचे क्रेडिट तिने नृत्यदिग्दर्शीका फुलवा खामकर यांना दिले आहे.
सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईकचा पाउस पाडला आहे.