सौरव गांगुली यांची लेक करते नोकरी, माजी क्रिकेटपटूच्या लेकीचा पॅकेज ऐकून व्हाल थक्क
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांची लेक झगमगत्या विश्वापासून दूर असते. सौरव गांगुली यांची मुलगी सना गंगुली हिला क्रिकेट किंवा बॉलिवूडमध्ये करियर करता आलं असतं. पण सना नोकरी करुन गडगंज पैसा कमावते.
1 / 5
सौरव गांगुली यांची मुलगी सना गंगुली हिने वयाच्या 22 व्या वर्षी कॉर्पोरेट विश्वात पदार्पण केलं. सना हिने युनायटेड किंगडम येथील युनिव्हर्सिटी मधून शिक्षण पूर्ण केले आहे. इकोनॉमिक्समध्ये सना हिने पदवी घेतली आहे.
2 / 5
लंडनमध्ये शिक्षण घेत असताना सना हिने अनेक कंपन्यांमध्ये इंटर्नशिप देखील केली. सना हिच्याकडे अनेक ग्लोबल एनएनसीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. सना हिने HSBC, KPMC, Goldman sachs, Barclas आणि ICICI कंपन्यासोबत सना हिने काम केलं आहे.
3 / 5
सना हिने पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मल्टीनॅशनल कंपनी PwC मध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. सना गांगुली हिचं स्टार्टिंग पॅकेज 30 लाख रुपये आहे. सध्या सर्वत्र सौरव गांगुली यांची लेक सना गांगुली हिची चर्चा रंगली आहे.
4 / 5
सना हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, सना ही आई डोना गांगुली यांच्याप्रमाणे शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेतलं नाही. पण सना शास्त्रीय नृत्य शिकली आहे. सना हिने अनेकदा स्टेजवर तिची कला सादर देखील केली आहे.
5 / 5
सौरव गांगुली यांची मुलगी सना गंगुली कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सना कायम सोशल मीडियावर आई-वडिलांसोबत फोटो आणि पोस्ट करत असते. सध्या सर्वत्र सना गांगुली हिच्या करियरची चर्चा रंगली आहे.