शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान ही 2023 मध्ये बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे सुहाना ही झोया अख्तरच्या 'द आर्चिज' या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत असणार आहे.
करण जोहरच्या चित्रपटातून अभिनेता संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी शनाया कपूर ही बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शनाया कपूर ज्या चित्रपटामधून पदार्पण करत आहे, त्याचे नाव बेधडक असे आहे.
अभिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा देखील 2023 मध्ये बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार असून द आर्चिज या चित्रपटात अगस्त्य नंदा महत्वाच्या भूमिकेत आहेत.
बोनी कपूरची लेक आणि जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर ही देखील द आर्चिज या चित्रपटामधून बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. झोया अख्तरचा हा चित्रपट आहे.
चित्रपट निर्माता राकेश रोशनची मुलगी आणि हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशन देखील बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. इश्क विश्क रिबाउंड या चित्रपटात ती महत्वाच्या भूमिकेत आहे.
श्वेता तिवारीची मुलगी अर्थात पलक तिवारी ही देखील 2023 मध्ये बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पलकच्या बाॅलिवूड पदार्पणासाठी श्वेता तिवारी हिने खूप जास्त मेहनत घेतलीये.
सलमान खान याची भाची आणि अलविरा खान आणि चित्रपट निर्माता अतूल अग्निहोत्री यांची मुलगी अलिझेह देखील बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हॉलिवूड रिमेक हिंदी चित्रपटात ती दिसणार आहे.