अभिषेक बच्चन याने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. उद्योजकाच्या माध्यमातून देखील अभिनेता कोट्यवधी रुपये कमाई करतो.
सांगायचं झालं तर, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी अम्मू आणि वत्स बंगल्याचा ग्राउंड फ्लोर स्टेट बँक ऑफ इंडियाला दिला आहे. 15 वर्षांसाठी बच्चन कुटुंबाने जमीन लिजवर दिली आहे.
अम्मू आणि वत्स बंगल्याचा ग्राउंड फ्लोर स्टेट बँक ऑफ इंडियाला दिल्यामुळे बॅंक बच्चन कुटुंबाला महिन्याला जवळपास 18 लाख रुपये भाडं म्हणून देते. म्हणजे बॅंक अभिषेक बच्चन याला वर्षाला कोट्यवधी रुपये भाडं म्हणून देते.
एवढंच नाही तर, अभिषेक याला स्पोर्टमध्ये देखील रस आहे. अभिनेता प्रो कब्बडी लीगमध्ये 'जयपूर पँथर्स' आणि इंडियन सुपर फुटबॉलमध्ये 'चेन्नईयिन फॅन क्लब'चा मालक आहे.
अभिषेक बच्चन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सिनेमा आणि जाहिरातींच्या माध्यमातून देखील अभिनेता कोट्यवधींची कमाई करतो. बच्चन कुटुंब बॉलिवूडमधील प्रतिष्ठित कुटुंबापैकी एक आहे.