Swara Bhaskar | स्वरा भास्कर दुसऱ्यांदा अडकणार लग्न बंधनात, हिंदू रितीरिवाजानुसार…
स्वरा भास्कर हिने काही दिवसांपूर्वीच फहाद अहमद याच्यासोबत लग्न केले. सोशल मीडीयावर लग्नाचे फोटो शेअर करत तिने चाहत्यांना धक्का दिला. अनेकांनी त्यावरून स्वरावर टिका देखील केली होती.
1 / 5
बाॅलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिने काही दिवसांपूर्वी लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना मोठा धक्का दिला. विशेष म्हणजे जानेवारी महिन्यातच स्वराने लग्नगाठ बांधली.
2 / 5
स्वरा भास्कर हिने समाजवादी पक्षाचा नेता फहाद अहमद याच्यासोबत कोर्ट मॅरेज केले आहे. 6 जानेवारीला यांचे लग्न पार पडले. स्वरा हिने फहाद अहमद याच्यासोबतचे लग्नाचे काही फोटोही शेअर केले होते.
3 / 5
फहाद अहमद याच्यासोबत लग्न केल्यानंतर अनेकांनी स्वरा भास्कर हिला ट्रोल करण्यास सुरूवात केली. काहींनी तर थेट दुसरी तुनिशा शर्मा स्वरा होणार असल्याचे म्हटले होते.
4 / 5
आता स्वरा भास्कर हिच्या लग्नासंबंधीत एक मोठी बातमी पुढे येतंय. स्वरा भास्कर हिचे आता हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न होणार आहे. विशेष म्हणजे या लग्नाची तयारी देखील सुरू करण्यात आलीये.
5 / 5
हळद, मेहंदी, संगीत आणि त्यानंतर रिसेप्शन हे सर्व फंक्शन देखील होणार आहेत. 11 ते 16 मार्च दरम्यान हे फंक्शन पार पडणार आहेत. विशेष म्हणजे आता लग्नाची पूर्ण तयारीही सुरू करण्यात आलीये.