
आमिर खानच्या सर्वांत दमदार चित्रपटांपैकी एक म्हणजे 'तारे जमीन पर'. ‘तारे जमीन पर’ चित्रपटात अभिनेता दर्शील सफारीनं ईशान अवस्थीची भूमिका साकारली होती.

आमिर खान दिग्दर्शित या चित्रपटाची कथा अमोल गुप्ते यांनी लिहिली आहे. चित्रपटाची कथा एका 8 वर्षांच्या मुलाची आहे, जो डिस्लेक्सिया नावाच्या आजारानं ग्रस्त आहे. या आजारानं ग्रस्त असल्यानं त्याला अभ्यास करणं कठीण जातं.

चित्रपटातील दर्शीलच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. चित्रपटात क्यूट वाटणारा दर्शील आता हँडसम हंक झाला आहे.

सोशल मीडियावर त्याने पोस्ट केलेल्या या फोटोंवरून तो 'तारे जमीन पर'मधला ईशान अवस्थीच आहे का, असा प्रश्न पडतो.

चित्रपटानंतर दर्शीलने काही टीव्ही शोजमध्ये काम केलं. याशिवाय तो काही जाहिरातींमध्येही झळकला. नुकतंच त्याने एका म्युझिक व्हिडीओमध्ये काम केलं.

काही दिवसांपूर्वीच दर्शीलची शॉर्ट फिल्म प्रदर्शित झाली होती. यामध्ये अभिनेत्री सुष्मिता सेनची मुलगी रिनी हिनेसुद्धा भूमिका साकारली होती.