रणबीर कपूर हा बॉलिवूडचा हटके अभिनेता आहे. त्यांच्या लूकवर अनेक मुली मरतात. पण तुम्हाला माहिती आहे की आणखी एक अभिनेता सेमटूसेम त्याच्यासारखा दिसतो.
रणबीर आणि कॅनेडियन अभिनेता रायन थॉमस गॉसलिंग हे दोघं सारखे दिसतात. या दोघांच्या देहबोलीपासून ते हास्यपर्यंत सर्व काही अगदी सेमटूसेम आहे.
रायननं बाल कलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली. 1993 ते 1999 या काळात त्यानं बाल कलाकार म्हणून काम केलं.
अभिनयाव्यतिरिक्त रायननं गायक आणि दिग्दर्शक म्हणूनही काम केलं आहे. दुसरीकडे रणबीर एक चांगला अभिनेता तसेच एक उत्तम कलाकार आहे.
रायन अनेक दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. तर गेल्या वर्षी 2018 मध्ये रणबीर देखील संजू या चित्रपटात दिसला होता. त्याच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.