राखी सावंत हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. काल रात्री राखी सावंत हिच्या आईचे निधन झाले. आईच्या निधनानंतर राखी पुर्ण पणे तुटलेली दिसली. राखी सावंत हिचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
राखी सावंत हिचा जो व्हिडीओ व्हायरल होतोय, त्यामध्ये राखी सावंत ही सलमान खान याचे नाव घेत रडताना दिसत आहे. सलमान भाई मेरी मम्मी नहीं रही असे राखी म्हणताना दिसत आहे.
सलमान खान हा राखी सावंत हिच्या आयुष्यामध्ये एखाद्या मसीहासारखा नक्कीच आहे. कारण आतापर्यंत राखी सावंत हिला अनेक प्रकारे सलमान खान याने मदत केलीये.
राखी सावंत जेंव्हा बिग बाॅसच्या घरात होती. त्यावेळी तिचा पती रितेश हा तिच्यासोबत चुकीचे वागत असताना रितेशला चांगलेच सलमान खाने याने फटकारले होते.
राखी सावंत हिच्या आईच्या उपचारांसाठी देखील सलमान खान याने मदत केलीये. इतकेच नाहीतर आदिल दुर्राणी याने राखी सावंत हिच्यासोबत लग्नाला नकार दिल्यानंतर सलमान खान यानेच आदिल दुर्राणी याला समजवल्याचे राखी सावंत हिने सांगितले.