
रोहित शेट्टी याचा शो खतरों के खिलाडी सीजन 13 चर्चेत आहे. सीजन 12 ने फुल धमाका केला. सीजन 12 टीआरपीमध्येही टाॅपला राहिले. आता सीजन 13 ची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

बिग बाॅसमध्ये सहभागी झालेले अनेकजण हे खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होतात. शिव ठाकरे, प्रियांका चाैधरी, अर्चना गाैतम, साैंदर्या शर्मा हे खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.

खतरों के खिलाडी सीजन 13 साठी बिग बाॅस 16 तील फेमस अभिनेत्री आणि सर्वांची आवडती इमली हिला देखील आॅफर देण्यात आलीये. मात्र, चक्क सुंबुल ताैकिर हिने खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होण्यास नकार दिलाय.

खतरों के खिलाडीची आॅफर सुंबुल ताैकीर हिने नाकारली आहे. रिपोर्टनुसार शोचे निर्माते मागेल तेवढी फी देण्यास सुंबुल ताैकीर हिला तयार आहेत. मात्र, असे असताना देखील सुंबुलने नकार दिलाय.

खतरों के खिलाडीमध्ये सुंबुल ताैकीर दिसणार नसल्याचे कळताच तिच्या चाहत्यांमध्ये नाराजी बघायला मिळत आहे. सुंबुल ताैकिर हिला तिच्या आगामी प्रोजेक्टवर लक्ष केद्रित करायचे असल्याने तिने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.