Top Zombie Movies | थ्रिलर चित्रपट पाहायला आवडतायत? मग, ओटीटीवर ‘हे’ झॉम्बीपट नक्की पाहा!
विज्ञान कल्पनेला समांतर, झॉम्बी चित्रपटांची क्रेझ देखील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. झॉम्बीशी संबंधित अनेक चित्रपट स्क्रीन आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यानंतर सुपर-डुपर हिट असल्याचे सिद्ध होत आहेत, यामागे हेच एक प्रमुख कारण आहे.
विज्ञान कल्पनेला समांतर, झॉम्बी चित्रपटांची क्रेझ देखील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. झॉम्बीशी संबंधित अनेक चित्रपट स्क्रीन आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यानंतर सुपर-डुपर हिट असल्याचे सिद्ध होत आहेत, यामागे हेच एक प्रमुख कारण आहे. आज आम्ही तुम्हाला हॉलिवूडच्या 8 सर्वात प्रसिद्ध झॉम्बी चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही आवर्जून पाहिलेच पाहिजेत. चला तर जाणून घेऊया...
Follow us
विज्ञान कल्पनेला समांतर, झॉम्बी चित्रपटांची क्रेझ देखील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. झॉम्बीशी संबंधित अनेक चित्रपट स्क्रीन आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यानंतर सुपर-डुपर हिट असल्याचे सिद्ध होत आहेत, यामागे हेच एक प्रमुख कारण आहे. आज आम्ही तुम्हाला हॉलिवूडच्या 8 सर्वात प्रसिद्ध झॉम्बी चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही आवर्जून पाहिलेच पाहिजेत. चला तर जाणून घेऊया…
वर्ल्ड वॉर Z : 2013 साली रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. हा चित्रपट आपल्याला अशा युगात घेऊन जातो, जिथे भयानक व्हायरसमुळे झॉम्बी साथीचा रोग पसरला आहे. शहरात पसरलेल्या धोकादायक झॉम्बीच्या साथीमुळे कोलाहल माजला आहे. या सगळ्या दरम्यान, गॅरी लेन (ब्रॅड पिट) आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी संघर्ष करत आहे. गॅरी त्याच्या कुटुंबाला वाचवू शकेल का? किंवा त्याच्या कुटुंबाला झॉम्बीने मारले आहे का? हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट जरूर पाहावा. या चित्रपटात तुम्हाला अॅक्शन, थ्रिलर, सस्पेन्स सर्वकाही मिळेल.
ट्रेन टू बुसान : हा चित्रपट इतका थरारक आणि रहस्यमय आहे की, एका क्षणासाठी स्क्रीनवरून डोळे हटवणे कठीण होते. 2016 साली आलेल्या या दक्षिण कोरियन चित्रपटाने झॉम्बी चित्रपटांचे अनेक विक्रम मोडीत काढले. हा चित्रपट आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातो, जिथे झॉम्बी व्हायरसने संक्रमित एक माणूस ट्रेनमध्ये चढतो. त्यानंतर तो इतर लोकांनाही संक्रमित करतो. या चित्रपटाचे बहुतेक चित्रीकरण रेल्वेच्या आत झाले आहे. एका ट्रेनमध्ये एक बाप आपल्या मुलीला या झॉम्बीपासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तो आपल्या मुलाला त्यांच्यापासून वाचवू शकेल की नाही? हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट जरूर पाहावा.
आय अॅम लिजेंड : विल स्मिथचा हा उत्कृष्ट चित्रपट आपल्याला थरारक जगात घेऊन जातो, जिथे झॉम्बी विषाणूचा उद्रेक झाला आहे. हा विषाणू शहरातील बहुतेक लोकांचा बळी घेतो आणि त्यांना नरभक्षक बनवतो. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी न्यूयॉर्क शहर रिकामे केले जाते. झॉम्बीला नियोजनाची समजही असते, हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
रेसिडेंट इव्हिल : या चित्रपटाचे एकूण 6 भाग आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत आणि 7वा भाग डिसेंबर 2021 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात Milla Jovovich मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचे सर्व भाग अतिशय उत्तम आहेत. या चित्रपटात झॉम्बी वर्ल्ड, तसेच विज्ञान कल्पनेचे मिश्रण पाहायला मिळेल.
अलाईव्ह : 2020 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बराच काळ चर्चेत होता. जेव्हा आपण कोरोना विषाणूच्या भीतीमुळे आपल्या घराबाहेर पडू शकत नव्हतो, तेव्हाच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात एक व्यक्ती झॉम्बी विषाणूमुळे त्याच्या घरात अडकल्याचे दाखवण्यात आले. हा चित्रपट थ्रिलिंग, तसेच बऱ्यापैकी सस्पेन्सफुल आहे. हा चित्रपट आवर्जून पहिलाच पाहिजे.