टीव्ही अभिनेत्री हिना खान कायमच चर्चेत असते. बिग बाॅसच्या घरात सहभागी होऊन हिनाने स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली.
हिनाची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे. आजही लोक तिला अक्षरा नावाने ओळखतात. ऐ रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतून हिनाला खरी ओळख मिळालीये.
हिना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. हिना आपल्या चाहत्यांसाठी कायमच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते.
हिना खानने निळ्या हॉल्टर नेक जंपसूटमध्ये हे फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये हिनाचा लूक बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.
हिनाने तिच्या नव्या फोटोशूटचे काही फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो चाहत्यांना देखील प्रचंड आवडले आहेत.