Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Underground Rivers : ‘या’ 5 नद्या आहेत भूमिगत, अनेक गुहांतून करतात प्रवास… हे फोटो पाहाच

काही लोकांचा असा विश्वास आहे की सरस्वती नदी आजही जमिनीखाली वाहते. जगात अनेक नद्या आहेत, ज्या जमिनीखाली वाहतात. अशाच काही नद्यांबद्दल जाणून घेऊया. (Underground Rivers: 'These' 5 rivers are underground, travel through many caves, See this photo)

| Updated on: Oct 09, 2021 | 1:28 PM
भारतातील नद्यांना पौराणिक, सामाजिक आणि आर्थिक महत्त्व आहे. तुम्ही गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमाबद्दलही ऐकलं असेलच. असं मानलं जातं की तिन्ही नद्या अलाहाबादजवळ एकमेकींना मिळतात, ज्याला त्रिवेणी संगम देखील म्हटलं जातं. परंतु फक्त गंगा आणि यमुना नद्या दिसतात, तर सरस्वती अदृश्य आहेत. यावर अनेक संशोधन झाली आहेत. फ्रेंच आद्य-इतिहासकार मिशेल डॅनिनो यांनीही सरस्वती नदीवर संशोधन अभ्यास केला आणि भूवैज्ञानिक बदलाचे श्रेय सरस्वतीच्या लुप्त होण्याला दिलं. काही लोकांचा असा विश्वास आहे की सरस्वती नदी आजही जमिनीखाली वाहते. जगात अनेक नद्या आहेत, ज्या जमिनीखाली वाहतात. अशाच काही नद्यांबद्दल जाणून घेऊया.

1 / 6
लॅबॉइच नदी, फ्रान्स: फ्रान्समधील लॅबॉइच नदी ही युरोपमधील सर्वात लांब भूगर्भातील नदी असल्याचं म्हटलं जातं. या नदीचा 1906 मध्ये प्रथम शोध लागला. दरवर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत पर्यटक ही नदी पाहण्यासाठी येतात. या नदीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाता येतं.

2 / 6
मिस्ट्री नदी, इंडियाना: अमेरिकेच्या इंडियानामध्ये एक भूमिगत नदी देखील आहे. अमेरिकेतील सर्वात लांब भूमिगत नदीला 'मिस्ट्री रिव्हर' म्हणतात. 19 व्या शतकापासून लोकांना याबद्दल माहिती आहे, परंतु 1940 नंतर तेथील सरकारने ते सामान्य लोकांसाठी खुले केले.

3 / 6
पर्टो प्रिंसेसा नदी, फिलिपिन्स: दक्षिण -पश्चिम फिलिपिन्समधील प्यूर्टो प्रिंसेसा नदी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. या नदीची लांबी सुमारे पाच मैल आहे. ही सुंदर नदी जमिनीखालील लेण्यांमधून वाहते आणि समुद्राला मिळते. येथे एका दिवसात फक्त 600 पर्यटकांना परवानगी आहे.

4 / 6
सँटा फे नदी, फ्लोरिडा: ही नदी अमेरिकेच्या उत्तर फ्लोरिडामध्ये आहे, ज्याची लांबी सुमारे 121 किलोमीटर आहे. जरी ती पूर्णपणे भूमिगत नसली, तरी ते 5 किमीपर्यंत भूगर्भातून वाहते. ओ'लेनो स्टेट पार्कमध्ये नदी एका मोठ्या सिंकहोलमध्ये येते आणि 5 किमीपर्यंत भूमिगत जाते. नंतर 5 किलोमीटर पुढे ते जलाशय राज्य उद्यानात दिसते.

5 / 6
रिओ कॅमू नदी, पोर्टो रिको: सुमारे दहा लाख वर्षे जुन्या लेण्यांमधून जाणाऱ्या रिओ कॅमू नदीचे स्वतःचे आकर्षण आहे. पोर्टो रिकोची रिओ कॅमु नदी जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी भूमिगत नदी असल्याचे म्हटले जाते.

6 / 6
Follow us
'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा
'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा.
शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट
शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट.
पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का
पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का.
'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा
'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा.
विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”
विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”.
राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली
राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली.
बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? राऊतांचा सुरेश धसांना खोचक सवाल
बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? राऊतांचा सुरेश धसांना खोचक सवाल.
'त्या' नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, मनोज जरांगेंचा रोख कोणावर?
'त्या' नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, मनोज जरांगेंचा रोख कोणावर?.
'कमाल'चा खोटापीडिया... आक्षेपार्ह मजकूर शेअर करत तोडले अकलेचे तारे
'कमाल'चा खोटापीडिया... आक्षेपार्ह मजकूर शेअर करत तोडले अकलेचे तारे.
'तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी...', सुप्रिया सुळे का भडकल्या?
'तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी...', सुप्रिया सुळे का भडकल्या?.