KGF Chapter 2: आमिर खानच्या ‘पीके’ला मागे टाकत ‘केजीएफ 2’ ठरलं ‘यश’स्वी; लवकरच ‘दंगल’लाही देणार टक्कर

| Updated on: Apr 26, 2022 | 3:35 PM

कन्नड सुपरस्टार यशची (Yash) मुख्य भूमिका असलेल्या 'केजीएफ: चाप्टर 2' (KGF Chapter 2) या चित्रपटाची अजूनही क्रेझ प्रेक्षकांमध्ये पहायला मिळतेय. प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटाने जगभरात दणक्यात कमाई केली आहे. नुकतंच या चित्रपटाने आमिर खानच्या 'पीके' या चित्रपटाचा विक्रम मोडला आहे.

1 / 5

2 / 5
चित्रपट व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालन यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. केजीएफ 2 ने आतापर्यंत जगभरात 883.56 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या कमाईसह केजीएफ 2 ने आमिर खानच्या 'पीके' या चित्रपटाच्या लाइफटाइम कलेक्शनला पार केलंय.

3 / 5
जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत आता केजीएफ 2 सहाव्या स्थानावर आहे. तर पीके हा चित्रपट सातव्या स्थानावर गेला आहे. या यादीत दंगल, बाहुबली 2, आरआरआर, बजरंगी भाईजान आणि सिक्रेट सुपरस्टार हे चित्रपट केजीएफ 2च्या पुढे आहेत. अजूनही थिएटरमध्ये या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय.

4 / 5
2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पीके' या चित्रपटाने जगभरात 854 कोटी रुपयांची कमाई केली होती. केजीएफने हाच आकडा पार करत जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सहावं स्थान मिळवलंय.

5 / 5
दुसरीकडे हाच चित्रपट आमिर खानच्या 'दंगल' या चित्रपटाच्या भारतातील कमाईलाही लवकरच मागे टाकणार आहे. केजीएफ 2च्या हिंदी व्हर्जनने आतापर्यंत भारतात 329.40 कोटी रुपयांची कमाई केली आहे.