PHOTO | डोसा, वडापाव, पाणीपुरी, रसगुल्ले अन् दाबेली… ‘स्वीटू’च्या बर्थडे केकवर पक्वानांची मेजवानी!
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Me Nandayla) या लोकप्रिय मालिकेत ‘स्वीटू’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री अन्विता फलटणकर (Anvita Phaltankar) हिचा वाढदिवस नुकताच सेटवर साजरा करण्यात आला.
1 / 8
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Me Nandayla) या लोकप्रिय मालिकेत ‘स्वीटू’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री अन्विता फलटणकर (Anvita Phaltankar) हिचा वाढदिवस नुकताच सेटवर साजरा करण्यात आला.
2 / 8
रील आयुष्याप्रमाणेच रियल आयुष्यातही अन्विता खूप फुडी आहे. तिला नेहमीच वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात.
3 / 8
अन्विताची हीच आवड लक्षात घेऊन, तिचा हा खास दिवस आणखी विशेष बनवण्यात आला होता.
4 / 8
मालिकेच्या सेटवर अन्विताचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. या दरम्यान तिच्यासाठी खास केक देखील आणण्यात आला होता.
5 / 8
लाडक्या ‘स्वीटू’च्या या बर्थडे केकवर चक्क अनेक पक्वान्नांची रेलचेल पाहायला मिळाली. डोसा, वडापाव, पाणीपुरी, रसगुल्ले आणि दाबेली असे सगळेच पदार्थ यावर दिसले अर्थात हे सगळे पदार्थ केक फाँडंटपासून बनवण्यात आले होते.
6 / 8
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत अभिनेत्री अन्विता फलटणकर ‘स्वीटू’ची भूमिका सकारात आहे. शरीराने काहीशी जाड पण मानाने अगदी निर्मल आणि संस्कारी स्वीटू सगळ्याच प्रेक्षकांना भावते आहे.
7 / 8
या आधी अन्विता फलटणकर ‘गर्ल्स’ आणि ‘टाईमपास’ या चित्रपटांमध्ये झळकली होती. या सोबतच तिने ‘व्हाय सो गंभीर’ या नाटकातही काम केले आहे.
8 / 8
लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं एकत्र येणं नव्हे, तर या नात्यात दोन कुटुंब जोडली जातात.आपलं माहेर, हक्काची माणसं सोडून मुलगी नव्या घरात जाते आणि तिथल्या माणसांना आपलसं करते. प्रत्येक गोष्ट शेअर करायला नवरा जरी सोबत असला तरीदेखील अनेकदा मुलींना त्यांच्या मैत्रिणींची उणीव भासत असते. परंतु, जर अशावेळी सासूचं मुलीची मैत्रीण झाली तर? खरं तर सासू-सुनेमधील मैत्रीचं हे नातं फार कमी वेळा पाहायला मिळतं. परंतु, येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत असंच सासू-सुनेचं मैत्रीचं नातं पाहायला मिळणार आहे.