‘ते’ही परत आलेत, रात्रीस खेळ चाले 3 पुन्हा येतंय, अण्णा नाईकांच्या कमबॅकची वेळ समजली का?

'रात्रीस खेळ चाले 3' साठी प्रेक्षकांना आता फार उत्सुकता ताणून धरावी लागणार नाही. कारण पुढच्याच आठवड्यापासून ही मालिका पुन्हा झी मराठीवर रुजू होत आहे.

| Updated on: Aug 08, 2021 | 2:25 PM
झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले' (Ratris Khel Chale 3)  या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांना चांगलेच खिळवून ठेवले आहे. पहिल्या दोन भागांना चाहत्यांकडून कमालीची लोकप्रियता मिळाली होती. मात्र तिसरा सिझन सुरु झाला आणि अल्पावधीत कोरोनामुळे ब्रेक लागला.

1 / 7
'रात्रीस खेळ चाले 3' साठी प्रेक्षकांना आता फार उत्सुकता ताणून धरावी लागणार नाही. कारण पुढच्याच आठवड्यापासून ही मालिका पुन्हा झी मराठीवर रुजू होत आहे. 16 ऑगस्टपासून नव्या वेळेनुसार सोमवार ते शनिवार रात्री 11 वाजता या मालिकेचं प्रसारण होणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र झी मराठीकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

2 / 7
 बदललेली वेळ आणि नव्या व्यक्तिरेखांचा भरणा यामुळे 'रात्रीस खेळ चाले 3' प्रेक्षकांची फारशी पकड घेऊ शकली नव्हती, मात्र आता कलाकारांसह लेखक, निर्माते आणि दिग्दर्शकही जोरदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

3 / 7
अण्णा नाईक, माई, शेवंता, पांडू या आपल्या आवडत्या पात्रांची प्रेक्षक वाट बघत आहेत. गेल्याच आठवड्यात पांडूची भूमिका साकारणारा अभिनेता आणि मालिकेचा लेखक प्रल्हाद कुडतरकर याने 'रात्रीस खेळ चाले 3' लवकरच सुरु होणार असल्याचं सांगितलं होतं.

4 / 7
 कोकणात प्रचंड पाऊस सुरु झाल्यामुळे पावसाचा व्यत्यय आला होता, मात्र अण्णा नाईकांची भूमिका साकारणारे दिग्गज कलाकार माधव अभ्यंकर यांनी फेसबुकवर फोटो शेअर करत शूटिंग पुन्हा सुरु झाल्याचं सांगितलं.

5 / 7
याशिवाय, ती परत आलीये ही नवीन मालिका 16 ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता पाहायला मिळणार आहे. विजय कदम यांची मुख्य भूमिका असलेली ही सस्पेन्स थ्रिलर आहे.

6 / 7
 प्रेक्षकांची आवडती देवमाणूस ही मालिका पुढच्या आठवड्यात निरोप घेणार आहे. रविवार 15 ऑगस्ट रोजी दोन तासांचा विशेष एपिसोड हा मालिकेचा शेवटचा भाग असेल. त्यामुळे डॉ. अजितकुमार देवचं काय होणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे

7 / 7
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.