Photo Gallery : दोन्ही बाजूंनी गहू – ज्वारी अन् मध्यभागीच अफूची लागवड, शेतकऱ्यांची शक्कल पाहून पोलीसही चक्रावले
सोलापूर : अफू लागवडीला परवानगी नसतानाही गेल्या काही दिवसांपासून अफू लागवडीच्या घटना समोर येत आहेत. उत्पन्न वाढण्याचा हा मधला मार्ग असला तरी कायद्याचे उल्लंघन करुन शेतकरी हे धाडस करीत आहेत. असाच प्रकार बार्शी शहरालगत असलेल्या फपाळवाडी शिवारात उघडकीस आला आहे. एक नाही तर तीन शेतकऱ्यांनी मिळून ही लागवड केली आहे.मध्यंतरी असे प्रकार अहमदनगर, परळी, लातूर येथे समोर आल्यानंतर हे लोण पश्चिम महाराष्ट्रातही असल्याचे उघड झाले आहे. मात्र, अफू बहरात असतानाच बार्शी ग्रामीण पोलिसांनी संबंधित शेतावर जाऊन झडती घेतली असता शेतात अफूची लागवड केल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान पोलिसांनी सर्व अफूची झाडे जप्त केली असून एकूण 14 लाख रुपयांचा हा मुद्देमाल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.यामध्ये रामेश्वर फपाळ, अरुण फपाळ आणि धर्मा फपाळ असे तीन आरोपी शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
Most Read Stories