
727 किलो अफू व आम्ली पदार्थ जप्त : उत्पन्न वाढवण्यासाठी अशा गैरमार्गाचा अवलंब केला जात आहे. या तीन शेतकऱ्यांनी अफूसह इतर आम्ली पदार्थांची लागवड केली होती. तब्बल 727 किलो आम्ली पदार्थ हे पोलीसांनी जप्त केले आहेत.

तीन शेतकऱ्यांचा समावेश : फपाळवाडी शिवारातील रामेश्वर फपाळ, अरुण फपाळ आणि धर्मा फपाळ असे तीन आरोपी शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक करुन त्यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्ये तसेच मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कायदा कलम 15, 18 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून शोध सुरु : एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात अफूचा लागवड केल्याचे समोर येताच पोलीसही थक्क झाले होते. शिवाय या शिवारात अणखी कोणी अफूची लागवड केली आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत.

असा लागला छडा: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातल्या फपाळवाडी या गावात तीन शेतकऱ्यांनी एकत्रितपणे अफूची लागवड केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनंतर बार्शी ग्रामीण पोलिसांनी संबंधित शेतावर जाऊन झडती घेतली असता शेतात अफूची लागवड केल्याची घटना उघडकीस आली.
