डाळिंबाचा महानैवेद्य...फुलांच्या शेषनागाच्या प्रतिकृतीची आकर्षक आरास... आणि त्यामध्ये गाभा-यात विराजमान गणरायाचे विलोभनीय रुप शेषात्मज गणेश जयंतीच्या निमित्ताने पहायला मिळाले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गाभा-यात गणरायासमोर सुमारे 500 डाळिंबांचा नैवेद्य दाखविण्यात आला.
याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता. त्यामुळे गाभा-यात या विषयाशी सुसंगत अशी आकर्षक पुष्पसजावट देखील करण्यात आली.
गणेश जयंतीनिमित्त मंदिरात सोमवारी सकाळी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले.
कोरोना नियमांचं पालन करत भाविकांनी मंदिराच्या बाहेरूनचं गणपतीचं दर्शन घेतलं.
दगडूशेठ मार्गावर भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.
एवढंच नाही तर भाविकांना फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.
कोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता भक्तांकरीता घरबसल्या दर्शनाची सोय देखील ट्रस्टनं केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे 24 तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.