सुंदर त्वचा
फळे जशी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तशीच ती आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहेत. फळे मॅश करा आणि आपल्या त्वचेवर लावा. यामुळे चेहरा चमकदार होण्यास मदत होते.
लिंबू नैसर्गिक ब्लीचिंग एजंट्ससाठी ओळखले जाते. लिंबामुळे चेहऱ्याला नैसर्गिक चमक येते. 2 चमचे लिंबाचा रस आणि एक चमचा गुलाब पाणी मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा.
संत्रीचा रस आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असतो. नियमितपणे संत्रीचा रस चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
मुलतानी माती त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. 2 चमचे मुलतानी मातीमध्ये एक चमचे चंदन पावडर आणि थोडे गुलाब पाणी मिसळा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल.