PHOTO | यात्रा रद्द करुनही भाविकांची तुफान गर्दी, अखेर यावलच्या तहसीलदारांकडून कारवाईचा बडगा
यावल तालुक्यातील अट्रावल येथील जागृत देवस्थान मुंजोबा या ठिकाणी मराठी माघ महिन्यात येणारा यात्रोत्सव सुरू झाला आहे (Devotee crowd at Munjoba temple in Yawal).
Follow us
यावल तालुक्यातील अट्रावल येथील जागृत देवस्थान मुंजोबा या ठिकाणी मराठी माघ महिन्यात येणारा यात्रोत्सव सुरू झाला आहे. हा यात्रोत्सव माघ पोर्णिमा म्हणजेच 27 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या यात्रोत्सवाला परवानगी नाकारली आहे. तरीदेखील याठिकाणी भाविकांची गर्दी उसळत आहे.
विशेष म्हणजे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती असल्याने मंदिर प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्यक होते. तसे न झाल्याने तहसीलदारांनी मंदिर प्रशासनाला 10 हजारांचा दंड ठोठावला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशावरून नियमांच्या अधिन राहून यंदाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, हा आदेश डावलून नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी उसळत आहे.
वेळोवेळी सूचना देऊनही मंदिर प्रशासनाने कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या नाहीत. यामुळे अट्रावल यात्रेत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली
यावलचे तहसीलदार महेश पवार यांनी आज कारवाईचा बडगा उगारत मंदिर प्रशासनाला दहा हजारांचा दंड ठोठावला.
दरम्यान, आज सोमवारी सकाळपासूनच नवस फेडण्यासाठी मुंजोबा देवस्थानात भाविकांची गर्दी झाली होती. याची माहिती यावल पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी मंदिर गाठून भाविकांची गर्दी पांगवली.