काश्मिरी मुस्लीमशी लग्नानंतर उर्मिला मातोंडकरने केलं होतं धर्मांतर?

अभिनेत्री उर्मिता मातोंडकर लग्नाच्या आठ वर्षांनंतर पती मोहसिन अख्तर मीरला घटस्फोट देणार असल्याची बातमी समोर येत आहे. उर्मिलाने 2016 मध्ये तिच्यापेक्षा वयाने 10 वर्षांनी लहान मोहसिनशी लग्न केलं होतं. त्यावेळी उर्मिलाच्या धर्मांतराच्याही चर्चा होत्या.

| Updated on: Sep 25, 2024 | 12:06 PM
लग्नाच्या आठ वर्षांनंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पती मोहसीन अख्तर मीरपासून विभक्त होणार असल्याची बातमी समोर येत आहे. 2016 मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रामुळे या दोघांची एकमेकांशी भेट झाली होती. लग्नानंतर उर्मिलाने धर्मांतर केल्याची त्यावेळी खूप चर्चा होती.

1 / 5
मोहसीन हा उर्मिलापेक्षा वयाने दहा वर्षांनी लहान असून तो काश्मिरी बिझनेसमन, अभिनेता आणि मॉडेल आहे. मोहसिनशी लग्न केल्यानंतर उर्मिलाने इस्लाम धर्म स्वीकारल्याची चर्चा होती. त्यावर 'बॉम्बे टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत उर्मिलाने स्पष्टीकरण दिलं होतं.

2 / 5
"अशा अफवा पसरवणं खूप चुकीचं आहे. अशा पद्धतीचं राजकारण मला अजिबात आवडत नाही. जरी मी धर्मांतर केलं तरी काय फरक पडणार आहे? मी नेहमीच माझ्या मर्जीनुसार वागले आणि ताठ मानाने प्रत्येक निर्णय घेतले आहेत. मला स्वत:वर खूप अभिमान आहे. मी असं म्हणत नाही की मी कधीही चुकले नाही, परंतु मला लाज वाटावी अशा गोष्टी मी कधीही केल्या नाहीत", असं उर्मिला म्हणाली होती.

3 / 5
"ज्या इंडस्ट्रीत मी काम करत होते, तिथे राहून नकारात्मकता, गॉसिप, एकमेकांच्या मागून बोलणं या सर्वांपासून लांब राहण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. मी कधीच या गोष्टी केल्या नाहीत. त्यामुळे धर्मांतराच्या चर्चांमुळे मी खूप चकीत झाले. मी हिंदू आहे आणि त्याच धर्माचं पालन करते. परंतु मी हिंदू धर्मावर व्यापक अर्थाने विश्वास ठेवते. हल्ली आपल्यावर ते थोपवलं जातं, त्यावर नाही", असं उर्मिलाने स्पष्ट केलं होतं.

4 / 5
धर्मांतराविषयी ती पुढे म्हणाली, "जरी मी इस्लाम धर्म स्वीकारला असता तरी ती गोष्ट मी अभिमानाने सांगितली असती. तरीसुद्धा माझ्या खासगी आयुष्यात नाक खुपसण्याचा अधिकार कोणालाच नाही. मी मुस्लीम व्यक्तीशी लग्न केल्याने धर्मनिरपेक्षतेबद्दल बोलतेय, असं नाही. उलट मला त्यावर विश्वास आहे आणि दुसऱ्या धर्मात लग्न करण्याविषयीचे माझे विचार आधीपासूनच स्पष्ट होते, म्हणून बोलतेय."

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.