Marathi News Photo gallery Diwali 2021 Hang these 3 things on the main door of the house to please Goddess Lakshami
Diwali 2021 : घराच्या मुख्य दारावर या तीन गोष्टी लावा, घरात लक्ष्मी नांदेल
दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करुन भक्तांच्या घरी वास्तव्यास येते, अशी मान्यता आहे. त्यामुळे देवीच्या स्वागतासाठी मुख्य दारावर तुम्ही तोरण लावू शकता. या दिवशी आंब्याचे, फुलांचे किंवा केळीच्या पानांचे तोरण बनवून ते लावू शकता.
Diwali 2021
Follow us
देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे – घराबाहेर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे लावणे खूप शुभ मानले जाते. पायाचे ठसे लावताना लक्षात ठेवा की पायाचे ठसे आतील बाजूस असावेत. आजकाल लक्ष्मी देवीच्या पावलांचे ठसे बाजारात सहज उपलब्ध असतात.
तोरण – दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करुन भक्तांच्या घरी वास्तव्यास येते, अशी मान्यता आहे. त्यामुळे देवीच्या स्वागतासाठी मुख्य दारावर तुम्ही तोरण लावू शकता. या दिवशी आंब्याचे, फुलांचे किंवा केळीच्या पानांचे तोरण बनवून ते लावू शकता.
स्वस्तिक – घराच्या मुख्य दरवाजावर चांदीचे स्वस्तिक लावणे खूप शुभ मानले जाते. तुम्ही चांदीच्या ऐवजी कुंकवाने स्वस्तिकही काढू शकता. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.