लग्नानंतर पुरुष अजून तरुण होतात का? नव्या रिसर्चने लोक हैराण
लग्न झाल्याचा वय वाढण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव पडतो का? या प्रश्नाच उत्तर इंटरनॅशनल सोशल वर्क जनरलमध्ये पब्लिश झालेल्या एका स्टडीमध्ये आहे.
Couple LoveImage Credit source: pexel.com
Follow us
रिसर्चनुसार, विवाहित पुरुषांची वय वाढण्याची प्रक्रिया अविवाहित पुरुषांच्या तुलनेत धिमी असते. पण हैराण करणारी बाब म्हणजे महिलांवर याचा परिणाम पूर्णपणे वेगळा दिसून आलाय.
संशोधकांनी 45 ते 85 वयोगटातील 20 हजारपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींचा 20 वर्ष अभ्यास केला. त्यांचं शारीरिक, मानसिक स्वास्थय, सामाजिक संबंध आणि आत्म धारणा या आधारावर वयाचा प्रभाव तपासला.
लग्नापूर्वीच होणाऱ्या जावयाला अटक
यासाठी पुरुषांच वैवाहिक आयुष्य स्थिर आणि स्वस्थ असलं पाहिजे. त्याशिवाय जोडीदारासोबतच्या खराब संबंधांमुळे पुरुषांची वय वाढण्याची प्रक्रिया वेगाने वाढते. स्टडीनुसार, लग्न झालेले पुरुष अविवाहित पुरुषांच्या तुलनेत जास्त स्थिर आणि संतुलित आयुष्य जगतात. याचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
लग्नामुळे पुरुषांच्या आयुष्यात शिस्त आणि जबाबदारी येते. त्यांना स्वत:ला स्वस्थ आणि अजून तरुण बनण्यासाठी प्रेरणा मिळते. याचा प्रभाव बॉडी सेल्सवर पडतो. नेचर ह्यूमन बिहेवियरमध्ये प्रकाशित एका सर्वेक्षणात असा खुलासा करण्यात आला आहे की, अविवाहित लोक विवाहित पुरुषांच्या तुलनेत 79 टक्के जास्त डिप्रेशनचा सामना करतात. घटस्फोटीत लोक 99 टक्के जास्त डिप्रेशनचा सामना करतात.