दाना चक्रीवादळ आता अवघ्या काही तासांमध्ये ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यावर धडकणार आहे.या चक्रीवादळाचे परिणाम दिसायला लागले असून, ओडीशामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
दाना चक्रीवादळाचा फटका हा ओडिशासोबतच पश्चिम बंगालला देखील मोठ्या प्रमाणात बसणार आहे, या दोन्ही राज्यांना हवामान विभागाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जवळपास पाचशे ट्रेन रद्द करण्यात आल्या असून, विमानांची उड्डाणं देखील रद्द करण्यात आली आहेत. एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आले आहेत.
जागतीक हवामान संस्थेकडून चक्रीवादळाचं नामकरण करण्यात येत असतं, चक्रीवादळाला नाव देताना त्या नावामुळे कोणत्या एखाद्या संप्रदायाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची खबरदारी घेतली जाते.
या चक्रीवादळालाळाला दाना हे नाव देण्यात आलं आहे, दाना हा शब्द हिंधू धर्म ग्रंथांमध्ये उल्लेख येणाऱ्या दानव अर्थात राक्षण या शब्दाशी बऱ्याचप्रमाणात मिळता जुळता आहे.
मात्र दाना या शब्दाचा अर्थ राक्षस असा नसून, हा मुळ शब्द अरबी भाषेतून घेतला आहे, दानाचा अरबी भाषेमधील अर्थ उदार असा होता. त्यामुळे या चक्रीवादळाला दाना असं नाव देण्यात आलं आहे.
दाना चक्रीवादळाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.